वैष्णोदेवी (Shri Vaishnodevi)
जम्मू राज्य मधील कटरातील त्रिकुटा पहाडी वर स्थित आहे. माता वैष्णों देवी मंदिर भारतातील अति महत्वपूर्ण धार्मिक स्थळ आहे. सर्वात पवित्र मंदिर मानले जाते. माता रानीचे हे मंदिर 5200 फूट ऊंच आणि कटरा पासून 12 किलोमीटर की दुर स्थित आहे
गुफा मध्ये देवी काली, सरस्वती आणि लक्ष्मी ची मूर्ती आहेत ज्यांना वैष्णों देवी किंवा माता रानी म्हटले जाते.
दल सरोवर (Dal Lake)
जम्मू कश्मीर मधील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ डल झील ज्याला ‘कश्मीर का रत्न’म्हटले जाते. हे कश्मीर मधील दूसरे मोठे सरोवर आहे. जे 2600 वर्ग क्षेत्रफळ मध्ये पसरलेले आहे.येथील मुख्य आकर्षण केंद्र हाउस बोट आणि शिंकरा राईड हे आहेत.
डल झील किनारी खूप हॉटेल आहेत. आपण कोणत्याही हॉटेल मध्ये न राहता डल झील स्थित कोणत्याही हाउस बोट मध्ये राहू शकता.
धार्मिक स्थळ अमरनाथ मंदिर- (Amarnath Temple)
धर्मिक और ऐतिहासिक दृष्ट्या अति महत्वपूर्ण अमरनाथ मंदिर एक प्रमुख तीर्थस्थल आजे.भगवान शिव ना समर्पित हे मंदिर श्रीनगर पासून 145 किलोमीटर दूर हिमालय पर्वताच्या कुशीत स्थित आहे. हे एक प्राकृतिक मंदिर आहे. याचा अर्थ आहे उत्पति झालेले. गुफा मध्ये स्थित शिवलिंगला बाबा बर्फानी आणि अमरेश्वर म्हटले जाते .श्री अमरनाथ गुफा ची लांबी 160 फुट आणि रुंदी 100 फुट आहे याच गुफेत भगवान शिव यांनी माता पार्वतीना अमर होण्याचे रहस्य सांगितल होत.
आषाढ़ पूर्णिमा पासून पूर्ण श्रावण महिन्यापर्यंत दर्शन साठी हजारो लाखों श्रद्धालु येथे येतात.
पहलगाम-(Pahalgam)
यावेळी फुलांच्या कुरणांवर, गोंडोला राइडद्वारे गुलमर्गच्या स्थानिक प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकाल.यादरम्यान अवंतीपुरा खंडहर, बेताब खोरे, अरू खोरे आणि चंदनवाडी देखील वाटेत फिरू शकता. यावेळी तुम्ही खोऱ्यातील नैसर्गिक पर्यटनाचा आनंद देखील घेऊ शकता. याशिवाय, तुम्ही येथे प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकता आणि टट्टूची सवारी करू शकता.
ट्युलिप गार्डन
जम्मू कश्मीर मध्ये मार्चचा शेवट आणि एप्रिल महिन्याचा सुरूवातीचा आठवडा हा 'ट्युलिप फेस्टिवल' म्हणून साजरा केला जातो. श्रीनगर मध्ये दरवर्षी त्याच आयोजन कश्मीर टुरिझम बोर्ड कडून केले जातं. येथील इंदिरा गांधी मेमोरिअल ट्युलिप गार्डन हे आशिया मधील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन आहे.
मार्च महिन्याचा शेवट किंवा एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून महिनाभरासाठी ट्युलिप गार्डन हे पर्यटकांसाठी खुलं करण्यात येतं. (पण तारखा पुढे- मागे होण्याची शक्यता असते)
वेळ आणि प्रवेश शुक्ल
इंदिरा गांधी मेमोरिअल ट्युलिप गार्डन सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आठवडाभर खुले असते. भारतीयांसाठी प्रौढांना प्रति व्यक्ती 50 रूपये तर लहान मुलांना 25 रूपये फी आकारली जाणार.
कसे पोहचाल?
श्रीनगर हे देशातील महत्त्वाच्या सार्या शहरांसोबत हवाईमार्गे आणि रस्ते मार्गे जोडले गेले आहे. ट्रेनने जाण्याचा विचार करत असाल तर जम्मू पर्यंत जाऊ शकता त्यापुढे रस्ते मार्गांनी जाऊ शकाल.
जम्मू आणि काश्मीर संबधीत पर्यटन माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
mast
उत्तर द्याहटवाThank you 🙏
हटवाvery nice
उत्तर द्याहटवाThank you 🙏
हटवा