महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण आहे.समुद्रसपाटीपासून १३७२ मी उंचीवर सह्याद्री पर्वत रांगेच्या पश्चिम घाटातील उंच माथ्यावर वसलेले महाबळेश्वर हे नगरपालिका असलेले तालुक्याचे ठिकाण आहे.ब्रिटीश काळापासून नाव लौकिक असणारे महाबळेश्वर ब्रिटीशांचे आवडते थंड हवेचे ठिकाण आहे.
महाराष्ट्रातील उत्कृष्ट गिरीस्थान असलेले हे ठिकाण महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.महाबळेश्वर मध्ये अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.पर्यटक महाबळेश्वर पर्यटनासाठी आल्यानंतर या ठिकाणांना जरूर भेट देतात.
पुण्यापासून १२० कि.मी.व मुंबई पासून २८५ कि.मी.अंतरावर असलेले महाबळेश्वर हे माल्कम पेठ,क्षेत्र महाबळेश्वर व शिन्दोला या तीन खेडेपासून बनलेले आहे.सर्व बाजूला खोल दऱ्या असणारा हा भाग वर्षभर हिरवाई ने नटलेला असतो.
पाच नद्यांचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो.क्षेत्र महाबळेश्वर,वेण्णा लेक,विविध पोइंत,बाजारपेठ,पाचगणी प्रतापगड,तापोळा अशी प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना आकर्षित करून घेतात.
महाबळेश्वर ची स्ट्रॉबेरी,लाल मुळे,गाजरे मध व गुलकंद तसेच चने,चिक्की,मक्याची कणसे पर्यटकांमध्ये प्रसिध्द आहेत.
महाबळेश्वर मधील प्रेक्षणीय स्थळे - Tourist places in Mahabaleshwar
वेण्णा लेक महाबळेश्वर | Venna lake Mahabaleshwar
महाबळेश्वर च्या मुख्य बाजारपेठेपासून ३ कि.मी.अंतरावर असलेले वेण्णा लेक हे महाबळेश्वर मधील प्रमुख प्रेक्षणीय ठिकाण आहे.चारी बाजूंनी हिरव्यागार वनराईने नटलेल्या या तलावाची सुंदरता शांत व नितळ पाण्याने आणखी वाढते.सन १८४२ साली सातारचे राजे श्रीमंत छ.आप्पा साहेब महाराज यांनी त्याकाळी महाबळेश्वर च्या पिण्याच्या पाण्यासाठी या लेक ची निर्मिती केली.२८ एकर विस्तार असलेले हे लेक बारमाही वाहणाऱ्या झर्या मुळे काठोकाठ भरलेले असते.या लेक च्या परिसरात उद्यानाची निर्मिती केलेली असून हिरवळ व विविध फुलांचे ताटवे फुललेले असतात.छायाचित्रण करण्यासाठी हा परिसर उत्तम आहे.
तलावामध्ये नौकाविहाराची सोय असून एक तासाला ४०० रु.मध्ये आपण तलावाच्या शांत पाण्यात नौकानयन करू शकतो.याच बरोबर घोडेस्वारी,मेरी-गो-राउंड,झोपाळे,विविध खाद्यपदार्थ यांचाही आपण आनंद या ठिकाणी घेऊ शकतो.
महाबळेश्वर मंदिर क्षेत्र महाबळेश्वर|Kshetra Mahabaleshwar
महाबळेश्वर च्या मुख्य बाजारपेठेपासून ५ कि.मी.अंतरावर क्षेत्र महाबळेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे. येथे फार प्राचीन असे महादेवाचे (महाबली) मंदिर असून यावरूनच या ठिकाणाला महाबळेश्वर असे नाव पडले या ठिकाणी तीन मंदिरे असून भगवान महादेवाचे मंदिर आहे.
कृष्णा,कोयना,वेण्णा,सावित्री,गायत्री या पाच नद्यांचा उगम असलेले पंचगंगा मंदिर,व १३ व्या शतकातील सर्वात जुने असे कृष्णाबाई मंदिर अशी तीन मंदिरे क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी आहेत.पाच नद्यांपैकी सावित्री ही नदी पश्चिम वाहिनी असून बाकीच्या चार नद्या पूर्व वाहिनी आहेत.
ऑर्थर सिट पॅाईंट महाबलेश्वर| Orthar sit point Mahabaleshwar
टायगर स्प्रिंग पॅाईंट| Tiger Spiring Point
ऑर्थर सिट पॅाईंट पासून जवळच टायगर स्प्रिंग पॅाईंट आहे.या ठिकाणी बारमाही वाहणारा पाण्याचा झरा असून पूर्वी इथे वाघाचे वास्तव्य होते.या पॅाईंट वरून कोकणचे अदभूत दृश्य पाहायला मिळते.गर्द झाडी असलेल्या या परिसरात काही वेळा रान गव्यांचे दर्शन होते
इको पॅाईंट | Eco Point
ऑर्थर सिट पॅाईंट,टायगर स्प्रिंग पॅाईंट व इको पॅाईंट हे एकमेकापासून जवळच असून आपण सहज पायी हे तिन्ही पॅाईंट पाहू शकतो.इको पॅाईंट समोर काही अंतरावर वाकडी पर्वतरांग आहे.इथे जर मोठ्याने ओरडले असता त्याचा प्रतिध्वनी(इको)ऐकायला मिळतो.इथून खाली दरीमधील दृश्य खूप सुंदर दिसते.
बॉम्बे पॅाईंट | Bombay Point Mahabaleshwar
महाबळेश्वरच्या पश्चिमेला असणारा बॉम्बे पॅाईंट पर्यटकांमध्ये खूप प्रसिध्द असणारा पॅाईंट आहे.सायंकाळच्या वेळी मावळत्या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक येतात.इथून दिसणारे सूर्यास्ताचे दृश्य खूपच सुंदर असते.या पॅाईंट ला सन सेट पोइंत म्हणूनही ओळखले जाते
मंकी पॅाईंट | Monkey Point
ऑर्थर सिट पॅाईंट च्या रस्त्यावर हा पॅाईंट आहे.या पॅाईंट वरून खाली खोल दरीत पाहिले असता,एका मोठ्या खडकावर तीन माकडे समोरासमोर बसली आहेत असे दिसते.
नीडल होल पॅाईंट /एलिफंट पॅाईंट | Elephant point
विल्सन पॅाईंट | Wilson Point Mahabaleshwar
सन १९२३ ते १९२६ च्या कालावधीत मुंबई प्रांताचे राज्यपाल असणारे सर लेस्ली विल्सन यांच्या नावाने या पॅाईंट ला ओळखले जाते.१४३९ मीटर उंचीवर असलेला हा पॅाईंट महाबळेश्वर मधील सर्वात उंच पॅाईंट आहे.या पॅाईंट वरून सूर्योदय व सूर्यास्त ही दोन्ही दृश्ये पाहता येतात.महाबळेश्वरच्या परिसराचे नयनरम्य दृश्य इथून पाहायला मिळते.महाबळेश्वर- मेढा मार्गावर असणारा हा पॅाईंट महाबळेश्वर पासून १.५ कि.मी.अंतरावर आहे
लिंगमळा धबधबाLingmala Waterfall Mahabaleshwar
महाबळेश्वर पासून ६ कि.मी.अंतरावर असणारा हा धबधबा खूप प्रसिध्द आहे.६०० फुट उंची वरून खाली कोसळणारा हा धबधबा जुलै ते डिसेंबर या काळात पाहण्यासारखा असतो.गर्द हिरवाई व स्वच्छ पाणी असणारा हा धबधबा पर्यटकांचा आवडता धबधबा आहे.
महाबळेश्वर बाजारपेठ – महाबळेश्वर बाजारपेठेमध्ये सायंकाळच्या वेळी फेरफटका मारणे हा पर्यटक म्हणून वेगळाच अनुभव असतो. महाबळेश्वर बस स्थानका पासून मुख्य चौका पर्यंत असलेली ही बाजारपेठ पर्यटकांनी सतत गजबजलेली असते.महाबळेश्वर ची प्रसिध्द स्ट्रॉबेरी,गजर,चने मध,चिक्की,लोकरीचे कपडे,कलाकुसरीच्या वस्तू यांची खरेदी महाबळेश्वर मध्ये केलीच जाते.
महाबळेश्वर ला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ | Best time to visit Mahabaleshwar
महाबळेश्वर हे उंचावर वसलेले ठिकाण असल्याने इथले वातावरण उन्हाळ्यातही आल्हाददायी असते.उन्हाळ्यामध्ये थंड हवेचा आनंद घेण्यासाठी पर्यटक महाबळेश्वर ला येत असल्याने महाबळेश्वर पर्यटनासाठी सर्वोत्तम कालावधी ऑक्टोबर ते मे असा आहे.जून ते सप्टेंबर या काळात महाबळेश्वर मध्ये खूप पाऊस पडतो.हल्ली वर्षा पर्यटनाकडे लोकांचा कल वाढल्याने पावसाळ्यातही पर्यटक महाबळेश्वर पर्यटकांनी फुललेले असते.
महाबळेश्वर ला कसे जावे | How to reach Mahabaleshwar
महाबळेश्वर हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने देशाच्या कानाकोपऱ्या तून तसेच विदेशातून पर्यटक महाबळेश्वरला येतात.
विमान :- How to reach Mahabaleshwar by Air
महाबळेश्वर साठी सर्वात जवळचे विमानतळ पुणे (१२० कि.मी)व मुंबई (२८५ कि.मी.) हे आहेत .पुणे व मुंबई देश- विदेशातील शहरांशी नियमित विमानसेवेने जोडले गेले आहे.
रेल्वे :- How to reach Mahabaleshwar by Railway
महाबळेश्वर हे उंचावरील पर्यटन स्थळ असल्याने इथे लोहमार्ग नाही.सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन सातारा हे असून ५० कि.मी. अंतरावर आहे.याच बरोबर पुणे (१२०कि.मी.) कोल्हापूर (१७० कि.मी.) या ठिकाणी देशातील प्रमुख ठिकाणहून रेल्वे ने येता येते.व या शहरातून महाबळेश्वर ला येणे खूप सोपे आहे.
रस्ता मार्ग :- How to reach Mahabaleshwar by Road
महाबळेश्वर हे सातारा,पुणे मुंबई अशा शहरांशी रस्ता मार्गाने जोडले गेले असून तीन घाट रस्ते महाबळेश्वर ला इतर शहरांशी जोडतात.पुणे,मुंबई कडून राष्ट्रीय महामार्गाने येणारे पर्यटक वाई वरून पसरणी घाट मार्गे महाबळेश्वर ला येऊ शकतात.कोल्हापूर,सातारा बाजूने येणारे पर्यटक केळघर मार्गे महाबळेश्वर ला येऊ शकतात.कोकण भागातून मुंबई-गोवा महामार्गाने येणारे पर्यटक पोलादपूर प्रतापगड मार्गे महाबळेश्वर ला येऊ शकतात.मुंबई,नाशिक,पुणे,बेळगाव,पणजी इत्यादी शहरातून महाबळेश्वर साठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस नियमित चालू असतात.तसेच अन्य राज्यातून महाबळेश्वर साठी खाजगी आरामबस नियमित सेवा देत असतात.
महाबळेश्वर मधील पर्यटन सुविधा
महाबळेश्वर पर्यटन करण्यासाठी बहुतांश पर्यटक स्वतः च्या वाहनाचा वापर करतात,परंतु महाबळेश्वर मध्ये टॅक्सी सेवा चांगली असून त्याचे दरही वाजवी आहेत.तसेच पर्यटन हंगामामध्ये राज्य परिवहन मंडळा मार्फत महाबळेश्वर दर्शन ही बस दररोज सुटते.
महाबळेश्वर मधील हॉटेल्स | Hotels in Mahabaleshwar
महाबळेश्वर मध्ये राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात हॉटेल्स उपलब्ध आहेत.पंच तारांकित हॉटेल्स पासून मध्यम किंवा कमी बजेट पर्यंतची हॉटेल्स उपलब्ध आहेत.पण पर्यटन हंगाम (ऑक्टोबर ते मे)या काळात हॉटेल्स चे दर थोडे जास्त असतात.
महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाला भेट द्यावी ही प्रत्येक पर्यटकाची इच्छा असते.महाबळेश्वरला येणे सहज सोपे आहे. हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.