मध्यप्रदेश राज्यातील छत्रपूर जिल्ह्यांमधील हे शहर काम शिल्प साठी संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे.युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये याचं नाव सामील आहे.
खजुराहो मंदिर प्रामुख्याने हिंदू आणि जैन मंदिरांचा संग्रह आहे ही सर्व मंदिरे प्राचीन असून चंदेल राजवंशाच्या काळामध्ये तयार केलेली आहेत त्यांची निर्मिती साधारणपणे 950 ते 1050 या काळामध्ये झाली होती प्राचीन काळामध्ये खजुराहोला खजूर पुरा या नावाने ओळखले जायचे.
खजुराहो मधील प्रमुख मंदिरे :
खजुराहो मध्ये एकूण ८५ मंदिरे आहेत.त्यापैकी काही मंदिरे खूपच प्रसिध्द असून जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ठ आहेत.
लक्ष्मण मंदिर
खजुराहो मधील लक्ष्मण मंदिर हे द्वितीय क्रमांकाचे मंदिर आहे.आकाराने विशाल असलेले हे मंदिर विष्णू या देवाला समर्पित आहे.
चित्रगुप्त मंदिर
चित्रगुप्त मंदिर हे खजुराहो मधील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.सुर्यदेवाला समर्पित असणाऱ्या या मंदिराची निर्मिती अकराव्या शतकात करण्यात आली होती.या मंदिरात सात घोड्यांच्या रथावर स्वार असलेली सूर्यदेवाची मूर्ती खूप आकर्षक आहे.
३) कंदरिया महादेव मंदिर
कंदरिया महादेव मंदिर हे खजुराहो मधील आकाराने सर्वात मोठे मंदिर आहे.या मंदिराची निर्मिती नवव्या शतकात झाली आहे. भगवान शंकराचे हे मंदिर खूप लोकप्रिय आहे.भगवान शंकराचे एक नाव कंदर्पी वरून अपभ्रंश होऊन या मंदिराचे नाव कंदरिया पडले असावे असे मानले जाते.
पर्यटनासाठी योग्य काळ:- कधीही जाऊ शकता.पावसाळ्याच्या दिवसात इथे मध्यम प्रकारचा पाउस पडतो.पर्यटनासाठी सर्वात योग्य काळ हा ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा आहे.
कसे जावे:-
रेल्वे:-
खजुराहो ला रेल्वे स्टेशन असून दिल्ली किंवा मुंबई वरून रेल्वेने खजुराहो ला सहजपणे जाऊ शकतो. दिल्लीच्या हजरत निझामुद्दीन स्टेशन वरून खजुराहो साठी नियमित ट्रेन उपलब्ध असते.खजुराहो पासून जवळचे मोठे रेल्वे स्टेशन हरपालपूर असून ९० कि.मी.अंतरावर आहे. आग्रा,कानपूर,भोपाल,झांसी,वाराणसी उदयपुर या शहरांशी खजुराहो नियमित ट्रेन द्वारे जोडले गेले आहे.
विमान:-
खजुराहो इथे विमानतळ असून शहरापासून ६ कि.मी.अंतरावर आहे. हा विमानतळ लहान असल्याने देशाच्या इतर शहरांशी थेट विमानसेवा उपलब्ध नाही.मात्र दिल्ली आणि वाराणसी हून दररोज विमानसेवा खजुराहो साठी उपलब्ध असते.विमानतळाच्या बाहेरच रिक्षा व बसेस मिळतात.
रस्ता मार्ग:-
मध्य प्रदेशातील प्रमुख शहरातून खजुराहो साठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस उपलब्ध असतात.तसेच खजुराहो हे राष्ट्रीय महामार्ग ३९ वरील ठिकाण असल्याने रस्ता मार्गाने देशातील प्रमुख शहरांशी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे.रस्ता मार्गाने खजुराहो ला जाणे हे अधिक आरामदायी व वेळेची बचत होते
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.share करा,like करा.. comment करा.
पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!.
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
Very good 👌👌
उत्तर द्याहटवाThank you 🙏
हटवाgood
उत्तर द्याहटवाThanks 🙏
हटवा