जगप्रसिद्ध या शनि मंदिराची विशेषता म्हणजे येथील शनिदेवाची पाषाण मूर्ती खुल्या आकाशाखाली उघड्यावरच संगमरवराच्या एक चौथर्यावर विराजित आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे. ही मूर्ती उंचीला पाच फुट नऊ इंच आणि लांबीला एक फुट सहा इंच आहे. शनि शिंगणापूरचे महत्त्व शनिदेवाच्या इतर सर्व मंदिरांपेक्षा वेगळे आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या गावातील लोक घरांना कुलूप लावत नाहीत.
श्रीशनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची आहे. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही.
उत्सव:- शनि अमावास्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते. शनि जयंतीस (वैशाळी अमावस्या) येथे उत्सव साजरा होतो.
वेळ :- शिंगणापूर येथील शनि मंदिर सकाळी ५ ते रात्री १० या वेळेत पूजेसाठी खुले असते.
कसे जाल:-
रेल्वे:- शनि शिंगणापूर मंदिरात जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे अहमदनगर, राहुरी, श्रीरामपूर आणि बेलापूर.
रस्ता:-शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर, पुणे पासून १६० किलोमीटर आणि औरंगाबादपासून ८४ किलोमीटर अंतरावर आहे.
विमान :- सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद असून शनी शिंगणापूरपासून ९० किमी अंतरावर आहे.
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.
पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!.
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
Chhan 👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏🙏
हटवा