दार्जिलिंग हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. पूर्ण भारतातच नाही तर विश्वभरामध्ये दार्जिलिंग चे नाव एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून घेतले जाते. तसे पाहिले तर दार्जिलिंगचे सौंदर्य शब्दात वर्णन करणे कठीण आहे, कारण इथलं मनमोहक सौंदर्य, शितल हवा व हिरव्यागार डोंगर-दऱ्या पर्यटकांना खूपच आकर्षक वाटतात. दार्जिलिंग च्या सभोवती बर्फाच्छादित पर्वत शिखरे, फुलांनी गजबजलेले बगीचे व हिरवीगार वनराई पाहिल्यानंतर जणूकाही आपण स्वर्गीय ठिकाणी आलो आहोत असा भास होतो.
दार्जिलिंगला जाऊन इथल्या स्वर्गीय निसर्गाचा आस्वाद घेणे म्हणजेच जीवनातील सर्व विवंचनेतून मुक्त होण्यासारखा आहे. निसर्गाचे सुंदर रूप येथे आल्या नंतर पाहता येते
दार्जीलिंग हे भारतातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक दार्जिलिंग पर्यटन करतात येथे आलेल्या पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्यामुळे सुखद आनंद प्राप्त होतो.
टायगर हिल: Tiger hill
टायगर हिल हे दार्जिलिंग मधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. टायगर हिल ची उंची समुद्रसपाटीपासून २५९० मीटर इतकी असून हे स्थळ सूर्यास्त पाहण्यासाठी सर्वाधिक प्रिय आहे.
या ठिकाणाहून कांचनगंगा पर्वत शिखराचा सुंदर असा देखावा पाहायला मिळतो. त्याच बरोबर बर्फाच्छादित पर्वत शिखरे आणि दार्जिलिंग खोऱ्यातील हिरवीगार वनराई पर्यटकांचे मन मोहून घेते.
टायगर हिल जवळच विश्व वारसा स्थळ म्हणून घोषित असलेले हिमालयन रेल्वे म्हणजेच टॉय ट्रेनचे सर्वात उंच रेल्वे स्टेशन आहे.
बतासिया लूप: Batasia loop
दार्जिलिंग टॉय ट्रेन चा मार्गातील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणजेच बतासिया लूप होय. या टॉय ट्रेन च्या मार्गामध्ये येणारा चढाव कमी करण्याच्या उद्देशाने बतासिया लूप ची निर्मिती करण्यात आली होती.
हा लूप अत्यंत सुंदर असून परिसराचे अद्भुत निसर्ग सौंदर्य या बतासिया लूपवरून आपल्याला पाहायला मिळते.दार्जिलिंग पासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लूप वर पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
इथून कांचनगंगा पर्वत शिखराचे अत्यंत मनोहारी रूप पाहता येते.दार्जिलिंग ला येणारी व जाणारी टॉय ट्रेन काही काळासाठी या बतासिया लूप वर थांबते त्यामुळे पर्यटकांना ट्रेन बाहेर येऊन इथले निसर्गसौंदर्य अनुभवण्याचा आनंद घेता येतो.
हिमालय पर्वतारोहण संस्था दार्जिलिंग: Himalayan mountaineering institute Darjeeling .
दार्जिलिंग मध्ये असलेली हिमालयन पर्वतारोहण संस्था जगातील सर्वश्रेष्ठ पर्वतारोहण संस्थेमधील मधील एक मानले जाते. दार्जिलिंग मधील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ही संस्था ओळखली जाते. या हिमालयन पर्वतारोहण संस्थेची स्थापना ४ नोव्हेंबर १९५४ रोजी करण्यात आली.
या संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश लोकांना पर्वतारोहण या खेळाची ओळख होणे व जगभरातील पर्वतारोही ना आपले कौशल्य विकसित करण्यासाठी या संस्थेचा लाभ होणे असा होता. दरवर्षी हजारो लोक या संस्थेमधून पर्वतारोहणाचे प्रशिक्षण पूर्ण करून जगातील अवघड व उंच समजणारे समजल्या जाणाऱ्या पर्वतांची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी सज्ज होतात.
रोपवे: Darjeeling Ropeway.
दार्जिलिंग हे संपूर्ण जगातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण पैकी एक मानले जाते इथल्या सुंदर डोंगर-दऱ्या, हिरवेगार चहाचे मळे, बर्फाच्छादित पर्वत शिखरे पर्यटकांच्या मनामध्ये घर करतात.
हे सर्व पाहण्यासाठी दार्जिलिंग रोपवे ची सफर करणे आवश्यक ठरते. आशिया खंडातील सर्वात लांब रोप-वे म्हणून ओळखला जाणारा हा रोप-वे पर्यटकांना एक रोमांचित करणारा अनुभव देतो. ज्यावेळी तुम्ही दार्जिलिंग पर्यटनासाठी जाल, त्यावेळी या रोप-वेची सफर करण्याचा आनंद जरूर घ्या.
रॉक गार्डन:Rock garden
दार्जिलिंगला येणारे पर्यटक रॉक गार्डन ला जरुर भेट देतात. सदा हरित वृक्ष संपदे मुळे उन्हाळ्याच्या दिवसात हे इथले वातावरण शितल असते.
दार्जिलिंग पासून दहा किलोमीटर अंतरावरील हे उद्यान बारबोटे रॉक गार्डन म्हणून हे ओळखले जाते. इथून दार्जिलिंग च्या आसपासच्या उंच डोंगर दर्या यांचा देखावा आपण पाहू शकतो.
संदकफु ट्रेक:Sandakphu trek.
संदकफु हे पश्चिम बंगालमधील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. या पर्वताकडे जाणारा मार्ग संदकफु ट्रेक म्हणून प्रसिद्ध आहे. जगभरातून पर्यटक संदकफु ट्रेक करण्यासाठी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग या थंड हवेच्या ठिकाणी येतात. या ट्रेकचा मार्ग सिमगा लीला नॅशनल पार्क जवळून जात असल्याने हिरवीगार वनराई, व बर्फाच्छादित पर्वत शिखरे असा अद्भुत निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो.
तिस्ता नदी मधील रिवर राफ्टींग: River rafting in Tista river.
ज्या पर्यटकांना रिवर राफ्टींग चा आनंद घ्यायचा असतो ते पर्यटक दार्जिलिंगला आवर्जून हजेरी लावतात कारण तिस्ता नदी मध्ये केले जाणारे रिवर राफ्टींग हे भारतातील सर्वात रोमांचकारी रिवर राफ्टींग पैकी एक आहे.
धाडसी पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते. या ठिकाणी ग्रेड १ ते ४ पर्यंतचे राफ्टिंग करता येते व यासाठी प्रशिक्षित गाईड व मार्गदर्शक तत्पर असतात.
पद्मजा नायडू हिमालयन झूलॉजिकल पार्क: Padmaja naidu himalayan zoological park.
दार्जिलिंग मधील पद्मजा नायडू झूलॉजिकल पार्क हे विविध प्रकारच्या वन्यप्राण्यांचे जवळून निरीक्षण करण्यासाठी योग्य ठिकाण आहे या पार्क मध्ये विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आपण पाहू शकतो. या पार्क मध्ये हिमबिबट्या व लाल पांडा यांचे निरीक्षणे करता येते त्याच बरोबर आशियाई काळे अस्वल, भुंकणारे हरीण, बिबट्या निळ्या आणि पिवळ्या रंगाचा मेकॉय,सिम कोल्हा, तसेच अनेक प्रकारचे पक्षी पाहता येतात.
टॉय ट्रेन जॉय राईड:Darjeeling toy train.
विश्व प्रसिद्ध ट्रेनला अनेक वेळा चित्रपटांमध्ये पाहिले आहे.
दार्जिलिंगला आलेला पर्यटक दार्जिलिंग ते घूम ही ट्रेन राईट घेऊ शकतो. दोन तासांची ही राईड 14 किलो मीटर अंतर पार करते. यादरम्यान ही टॉय ट्रेन घूम इथे पंचवीस मिनिटे थांबते. या ठिकाणी असलेल्या दार्जिलिंग ट्रेन म्युझियम ला पर्यटक भेट देतात व बताशिया लूप इथे ही ट्रेन दहा मिनिटे थांबते.कांचनगंगा पर्वत शिखर व आजूबाजूचा परिसर इथून आपण पाहू शकतो.
पर्यटनासाठी योग्य कालखंड:Best time to visit Darjeeling
दार्जीलिंग पर्यटनाचा सर्वात चांगला कालखंड म्हणजे एप्रिल ते जून या महिन्याच्या दरम्यान असतो. या काळात संपूर्ण भारतात कडक उन्हाळा असतो. यावेळी दार्जिलिंग चे तापमान १४ ते ८ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असते. या काळात इथल्या थंड वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दार्जिलिंग येतात. तसेच इथल्या थंडीचा अनुभव घ्यायचा असेल तर नोव्हेंबर ते डिसेंबर हा काळी योग्य ठरतो या काळात दार्जिलिंग मधील तापमान एक डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होते.
पावसाळ्याच्या काळात फारच कमी पर्यटक येतात कारण इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो व दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडतात. डिसेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये मधुचंद्र साजरा करण्यासाठी अनेक नवपरिणीत दाम्पत्ये दार्जिलिंगला पसंती देतात
दार्जिलिंग मधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ:Best food in Darjeeling.
दार्जिलिंग हे पश्चिम बंगालमधील पश्चिम बंगालमधील थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे बंगाली पद्धतीचे जेवण सहज उपलब्ध होते व हेच दार्जिलिंग मधील लोकांचे प्रमुख जेवण असते त्याच बरोबर नूडल्स, मोमो, समोसे असे चटपटीत पदार्थ इथे सहज मिळतात. इथले मोमो प्रसिद्ध असून दार्जिलिंगला आलेले पर्यटक मोमो चा आस्वाद आवर्जून घेतात.तसेच दार्जिलिंग ओळखले जाते ते चहा साठी.दार्जिलिंग चहा जगप्रसिद्ध असून जगभरात निर्यात होतो.
कसे जावे:How to reach Darjeeling
विमान सेवा:-
दार्जीलिंग साठी सर्वात जवळचा विमानतळ बागडोगरा हा आहे दार्जिलिंग पासून ८८ किलोमीटर अंतरावर आहे. या विमानतळावरून दार्जिलिंग ला जाण्यासाठी अनेक टॅक्सी कॅब व बसेस मिळतात. विमानतळ ते दार्जिलिंग हे अंतर साडेतीन तासांचे आहे. बागडोगरा या विमानतळासाठी देशातील प्रमुख शहरातून थेट विमानसेवा उपलब्ध असते
रेल्वे सेवा:-
जलपाईगुडी रेल्वे स्टेशन दार्जीलिंग साठी सर्वात जवळचे असून ८८ किलोमीटर अंतरावर आहे. या रेल्वे स्टेशन बाहेरून दार्जीलिंग साठी टॅक्सी व बसेस सहज मिळतात.
न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशन देशाच्या प्रमुख शहरांशी लोहमार्गाने जोडले असून ईशान्य भारतात जाणाऱ्या सर्व रेल्वे या स्थानकावर थांबा घेतात.
बस सेवा:-
दार्जिलिंग ला जाण्यासाठी सिलिगुडी व गंगटोक इथून दररोज बस सेवा चालू असते. गंगटोक या शहरातून दार्जीलिंग साठी भरपूर बसेस व शेअरिंग जीप मिळतात. तीन ते साडेतीन तासात दार्जिलिंगला पोहोचू शकतो.
दार्जिलिंग मध्ये कुठे राहाल?
दार्जिलिंग हे भारतातील प्रसिद्ध हिल स्टेशन असल्याने येथे लो बजेट पासून हाय बजेट पर्यंत सर्व प्रकारचे हॉटेल्स उपलब्ध आहेत. आवश्यकतेनुसार हॉटेलची निवड करू शकता तरीही दार्जिलिंग मधील काही प्रसिद्ध हॉटेल ची नावे पुढील प्रमाणे.
लिटल किंमत रिसॉर्ट
हॉटेल विला एव्हरेस्ट
लिटिल सिंगामारी होम स्टे
मायफेअर दार्जीलिंग
शान्गरी ला रिजेन्सी
स्टारलिंग दार्जीलिंग
विंडमेअर हॉटेल
सिंकलेर दार्जीलिंग
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.